बिलोली वृत्तसेवा
बिलोली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक पंचायत समिती गण हे अनुसुचित जाती महीला साठी राखीव असुन या गणातुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भास्कर तरटे यांच्या पत्नी सौ .मिराताई तरटे ह्या पंचायत समिती गणातुन उमेदवारीसाठी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्याकडे मागणी केली आहे. सौ. तरटे या केरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोलीचे संचालक भास्कर तरटे यांच्या पत्नी आहेत .भास्कर तरटे हे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे समर्थक असुन अनेक वर्षांपासून खतगावकर यांच्या सोबत राजकिय प्रवाहात आहेत अटकळी गणात जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे रास्त भाव धान्य दूकानदार संघटनेचे बिलोली उपाध्यक्ष होते . त्यामुळे उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे




