.बिलोली वृत्तसेवा
अटकळी येथील सामाजिक कार्यकर्ते देगलुर बिलोली चे आमदार समर्थक शिवलिंग गायकवाड यांच्या भावजय मोठे बंधू राजू गायकवाड यांच्या पत्नी सौ देवनंदा राजू गायकवाड ह्या पंचायत समिती अटकळी गणातुन भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक उमेदवार म्हणून वरिष्ठाकडे मागणी केली. शिवलिंग गायकवाड हे लोकप्रिय आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांचे निकटवर्तीय व विश्वासू मानले जातात. गेले पंधरा ते वीस वर्षापासून ते अटकळी व अटकळी परिसरात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ते अनेक संघटना व आंदोलनामध्ये सक्रिय असतात. म्हणून अटकळी गण व गट परिसरात त्यांचा चांगला मित्रपरिवार व जनसंपर्क आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी व वरिष्ठ यांनी संधी दिल्यास भारतीय जनता पक्षाला नक्कीच फायदा होईल




