देगलूर तालुक्यातील तमलूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३5 व्या जयंतीच्या कार्यक्रमादरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा अपमान केल्याप्रकरणी संतोष चन्नप्पा मांडे यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी तमलूर येथील सामाजिक कार्यकर्ते रवी फरसे यांनी देगलुर स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
नेमकं काय घडलं?
दि. २६ एप्रिल २०२६ रोजी तमलूर येथे भिमजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात संतोष मांडे यांनी जाणीवपूर्वक स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीचा फोटो मोठा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तुलनेने लहान लावला. तसेच प्रतिमांची मांडणीही आक्षेपार्ह पद्धतीने केल्याचा आरोप रवी फरसे यांनी तक्रारीत केला आहे.
समाजात संतापाची लाट
बहुजनांचे दैवत, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता व कर्तृत्व अतुलनीय आहे. त्यांनी समाजातील सर्व मागासवर्गीय घटकांसाठी अविस्मरणीय कार्य केले. असे असताना जयंतीदिनीच त्यांच्या प्रतिमेचा अपमान करणारा हा प्रकार अत्यंत निंदनीय असून समाजातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीस कारवाईची मागणी
या समाजकंटक प्रकारामुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे संतोष मांडे यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी रवी फरसे यांनी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
“महामानवाचा अवमान करणाऱ्यांना माफी नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल” – *रवी फरसे, सामाजिक कार्यकर्त





