बिलोली तालुक्यातील मौजे मिनकी येथे दि. 30 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 9:00 वाजता पंचशील ध्वजरोहणाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर कु. मयुरी अश्विनी खंडेराव सर्जे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रभावी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काळे रोशन यांनी केले.
यावेळी नवयुवक भीमशक्ती जयंती मंडळाचे अध्यक्ष अक्षय सर्जे व उपाध्यक्ष शंकर सोनकांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच अक्षय सर्जे यांच्या हस्ते संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी 5:00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांची भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली.
अशा प्रकारे मौजे मिनकी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.





