वसमत
वसमत नगर परिषद प्रशासनाकडून सध्या सुरू असलेले दलितवाणी प्रेस ते कातनेश्वरकर कॉम्प्लेक्स पर्यंतचे सुरु असलेले सि.सी. रोडचे काम हे लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे,वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवून तक्रारकर्त्यांची क्रूर थट्टा केली आहे त्यामुळे प्रशासनाच्या या आंधळ्या आणि बहिऱ्या कारभाराचा जाहीर निषेध करण्यासाठी खालील मागण्यांसाठी जनआक्रोश आंदोलनाचे रणशिंग फुकले आहे.
न्यायोचित मागण्या
1) रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरणारी आणि राजकीय वरदहस्त असलेली अतिक्रमणे तात्काळ जमीनदोस्त करा. अतिक्रमण न काढता रस्ता बनवणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे आहे त्यामुळे त्या अतिक्रमनावर बुलडोजर फिरवा.
तक्रारकर्त्यांना खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या वसमत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, नगर रचनाकार व बांधकाम अभियंता यांच्यावर फौंजदारी कारवाई करण्यात यावी.
सि.सी. रोडचे काम तांत्रिक निकष धाब्यावर बसवून तक्रार कर्त्याच्या हरकती विचारात न घेता हुकूमशाही पद्धतीने सुरू असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हे नियमबाह्य काम जैसे थे वैसे स्थितीत स्थगित करावे.
पारदर्शकतेचा अभाव आणण्यासाठी रस्ते कामाचे अंदाज पत्रक आणि नकाशा सार्वजनिक करावा,
हे आंदोलन केवळ एक औपचारिकता नसून, प्रशासकीय झोप उडवणारा ‘आक्रोश आहे त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावतील अतिक्रम हटवून वसमत शहरराला अतिक्रमण मुक्त करावे.
आता आश्वासनांचा काळ संपला आहे, आता फक्त न्यायाचा विचार होईल,जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे असेल,
हलकी बजाओ आंदोलन करून महामाहीम राज्यपाल यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे यांच्या वतीने देण्यात आले.
आंदोलनकर्ते मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयात गेले असता तिथे कोणीच दिसून आले नाही त्यामुळे खुर्चीला निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.





