फुले शाहू आंबेडकर आण्णा भाऊ साठे यांचे विचार ग्रामीण भागात रुजवणे हेच माझे ध्येय -मारोती एडकेवार
बिलोली : हिप्परगा थडी येथील सामाजिक क्षेत्रात आणि अन्यायाविरुद्ध व सत्य ची बाजू मांडणारा तसेच फुले,शाहू, आंबेडकर, यांच्या विचारधारा ग्रामीण भागात रुजवणारे सत्यशोधक व वंचित बहुजन आघाडी बिलोली तालुक्याचे सदस्य व पत्रकार मारोती जकोजी एडकेवार यांना नुकतीच इंडियन हेल्थ अवारेनेस असोसिएशन होनेस्ट फाउंडेशन उत्तराखंड भारत यांनी डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटेलिजन्स अवार्डने त्यांना सन्मानित करून पोस्टद्वारे सन्मानपत्र पाठवण्यात आले आहे.पत्रकार मारोती जकोजी एडकेवार हे बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथील रहिवासी असून त्यांची तालुक्यात एक स्वाभिमानी सामाजिक कार्यकर्ता व राजकीय कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.त्यांनी २०१७ पासून सत्यशोधक समाजाची संघटना मजबूत करण्याचं कार्य व महात्मा ज्योतिबा फुले व शाहू,आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागाळातील ग्रामीण भागातील लोकांच्या हृदयात रुजवण्याचं कार्य चालू आहे. स्वतः खेडोपाडी फिरून छोटासा व्यवसाय करत सामाजिक कार्य जोपासण्याचे काम व सामान्य गोरगरीब लोकांवरती अन्याय झाला तिथे न्याय देण्यासाठी खंबीरपणे उभा टाकणारे व त्यांच्यासाठी वर्तमानपत्रामधून सामान्य लोकांचा आवाज उठवणारे पत्रकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे ग्रामीण भागातील स्वाभिमानी कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांचे खंदे समर्थक व विश्वासू अशी त्यांची ओळख आहे.हिपरगा थडी येथील डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अभ्यासिका व वाचनालयाचे अध्यक्ष म्हणून त्यांच कार्य चालू आहे.आर्थिक परिस्थितीने गरीब असून सुद्धा स्वतःचा व्यवसाय करत समाजासाठी वेळ देणं सामाजिक कार्यात सहभागी होणं राजकीय कार्यात सहभागी होणे अन्याय झाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी उभा राहणारा व्यक्ती व सर्व समाजामध्ये मन मिसळून राहणारा व्यक्ती व सत्यशोधक मारोती एडकेवार यांची ओळख आहे.त्यांना मिळालेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटेलिजन्स अवार्ड देऊन सन्मानित केल्यामुळे त्याच्या कार्याला सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.




