लोहगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली लेखी तक्रार.
बिलोली
तालुक्यातील मौजे लोहगाव येथे विविध योजने अंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामाच्या निधीचा गैरव्यवहार झाल्याची सामाजिक कार्यकर्ते वैभव वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे.
लोहगाव येथे गेल्या कित्येक वर्षापासून ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून श्री.बैलके कार्यरत आहेत. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ग्रामपंचायतीला विविध योजनेतून आलेल्या निधीचा गैरव्यवहार केला व कार्यालयात वेळेवर किंबहुना महिन्यातून केवळ दहा दिवस उपस्थित राहून नागरिकांना त्यांच्या आवश्यक कामाची हेळसांड करीत असतात. तेवढेच नाही तर गावातील नागरिकांना उध्दट बोलणे, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात.
आणि घरपट्टी, नळपट्टी व इतर आवश्यक काही कागदपत्रे यांच्यावर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांच्या काही हस्तकांना हाताशी धरून पैसे उकळीत आहेत. अशा आशयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, गटविकास अधिकारी बिलोली यांच्याकडे निवेदन वैभव कुमार वाघमारे यांनी दिलेले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की,विकास निधी हडप करणाऱ्या ग्रामसेवक श्री बैलके यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. किंबहुना त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक यांची नेमणूक करण्यात यावी.
परंतु सदर प्रकरणी सरपंच यांच्यावर दोषारोप तक्रारदारांनी न केल्याने केवळ ग्रामसेवकच दोषी असू शकतात का? असाही प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठांनी यावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारण काल-परवा सरपंचांनी आयोजित केलेल्या त्यांच्या राजमाता इंग्रजी माध्यम शाळेच्या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी बी.एम. पाटील यांच्या उपस्थितीत स्त्री शिक्षणाचे जनक माता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन न करता धार्मिक तथा काल्पनिक देवीची पूजा करून कार्यक्रम संपन्न केल्याने, पुरोगामी विचारधारेच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सदर प्रकरण सरपंच यांच्या पण अंगलट येणार असल्याची चर्चा परिसरात चालू आहे.






