सहा महिलांची सुटका तर दोन आरोपीसह सहा लाख रुपये मुद्देमाल जप्त.
साईनाथ कांबळे
नायगांव
तालुक्यातील नरसी येथील देगलूर रोड वर असलेल्या राज बार ॲन्ड रेस्टॉरंट मध्ये महिलांचा अवैध देह विक्रीचा व्यवसाय चालू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी धाड टाकून धडक कार्यवाही केली.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या कित्येक दिवसापासून नमूद ठिकाणी लॉजिंगच्या नावाखाली महिलांचा देहविक्रीचा व्यवसाय चालू असल्याची सर्वत्र चर्चा होती. आज बिलोली चे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, या ठिकाणी काही महिलांना देह विक्रीसाठी बंदिस्त केले आहे. यानुसार सदर ठिकाणी बिलोली उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली धाड मोठी कारवाई केली.
एक डमी (बनावट) ग्राहक पाठवून पडताळणी करण्यात आली यामध्ये राजबार अँड रेस्टॉरंट मधील वरच्या मजल्यावर वेश्या व्यवसाय चालू असल्याचे निष्पन्न झाले. सदर ठिकाणी दोन आरोपी मिळून आले. यातील आरोपी नामे सोहेल शेख रा. पनवेल मुंबई यांनी विचारपूस मध्ये कबूल केले की, वेश्या व्यवसायासाठी या ठिकाणी महिला पूर्वी होता. सदर ठिकाणी आरोपी संतोष पवळे, शिवा पवळे यांना अटक करण्यात आले.
या कार्यवाहीमध्ये एक ईरटीका कंपनीची कार, सहा मोबाईल, व रोख रक्कम 47 हजार 500 असे मिळून एकूण 607500 रुपये मुद्देमाल रक्कम जप्त करण्यात आली. यानुसार रामतीर्थ पोलीस ठाण्यात स.पो.नि. कमल शिंदे यांच्या फिर्यादीनुसार पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही बिलोली उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, स.पो.नि .कमल शिंदे पोलीस स्टेशन बिलोली, पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवार पो. स्टेशन नायगाव, पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान कोतापले, भार्गव सुवर्णकार, ममता बादे, नरावाड, तोटावाड, धुरपटवाड, अंभोरे, वनशेटे, सोळंके, वायकुळे, पुणे बोईनवाड, कोल्हे, पवार, सूर्यवंशी, मेंडके, यांनी पार पाडली.
यापूर्वी नरसी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रामतीर्थ पोलिसांच्या सदर प्रकार लक्षात आणून दिला होता. त्यानुसार रामतीर्थ पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे कार्यवाही करण्यास तयारीत असताना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यवाही केल्याने अवैध धंदे वाल्यांचे धाबे दनानले आहेत.






