बिलोली/
साईनाथ कांबळे
तालुक्यातील जिगळा येथील नवयुवक भीम जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी विद्याधर कांबळे तर सचिव पदी प्रतिक कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त येत्या 22 एप्रिल रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही जिगळा नगरीत विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात भीम जन्मोत्सव साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने आज रोजी सम्यक बुद्ध विहार जिगळा येथे नियोजन बैठक संपन्न झाली. त्यात अध्यक्षपदी विद्याधर कांबळे तर सचिव पदी प्रतिक कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्ष कपिल झगडे,ओम कांबळे, सहसचिव अभिजीत हनुमंते, कोषाध्यक्ष सुमेध कांबळे,सल्लागार साईनाथ कांबळे ,मार्गदर्शक राहुल जिगळेकर, तर सदस्य संतोष भद्रे,वैभव सोनकांबळे,आकाश राक्षसमारे,सतीश सोंडारे व इतर सर्व समाज बांधव अशी निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारणी चे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.
या बैठकीच्या वेळी हानमाबाई झगडे, सुनिता किशन कांबळे, पिराजी कांबळे,किशन कांबळे,गौतम कांबळे,रघुनाथ कांबळे, सिद्धाराम कांबळे, यांच्यासह अनेक समाज बांधव व महिला उपस्थित होते.






