प्रशासनाची दिशाभूल करीत बोगस नोंदणी करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्याची जिल्हा निबंधकासह महसूल प्रशासनाकडे केली सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार
नायगांव/प्रतिनिधी
तालुक्यातील नरसी येथे विठ्ठलाच्या पूजे करिता तथा आषाढी उत्सवासाठी राखीव असलेली इनामी जमीनी वर गावातील काही लोकांनी अतिक्रमण करीत,प्रशासनाची दिशाभूल करून आपल्या नावे नोंदणी करीत जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याची सामाजिक कार्यकर्ता सचिन भेदे यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे.
नरसी येथील गट क्रमांक २४९ मधील ३ हेक्टर ८२ आर एवढी जमीन विठ्ठलाच्या देवळाच्या पूजा करिता तथा आषाढी उत्सवासाठी राखीव असलेली इनामी जमीन आहे.येथे पुजारी म्हणून असलेले जयराम लक्ष्मण कुंचोली यांनी व यांच्या वारसा कडून बेकायदेशीर विक्रीवर खरेदी करून सदर जागेवर अतिक्रमण करून कब्जा करून जागा हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याची निवेदन सचिन भेदे यांनी जिल्हा निबंधक नोंदणी व मुद्रांक कार्यालय नांदेड व उपविभागीय अधिकारी बिलोली आणि तहसीलदार नायगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केली आहे.
इनामी जमीन विकण्याचा व खरेदी करण्याचा कोणालाही अधिकार नाही असे असताना ही गावातील काही धन दांडग्या लोकांना हाताशी धरून शासनाची दिशाभूल करीत सदर जमिनीची खरेदी व विक्री करून आपल्या नावावर नोंदणी केल्याचाही प्रकार सातबारा वरून दिसून येत आहे.
यावर तात्काळ कारवाई करून सदर जागा मोकळी करण्यात यावी आणि श्री विठ्ठलावर श्रद्धा असणाऱ्या भक्ताना आषाढी उत्सव साजरा करण्यात यावा या अनुषंगाने अतिक्रमण हटवण्यात यावे व बोगस करण्यात आलेल्या नोंदणी तात्काळ रद्द करून पूर्वरत आषाढी उत्सवासाठी इनामी जमीन अशी नोंद करण्यात यावी. अशा अशयाचे निवेदन प्रशासनाकडे देण्यात आले होते.
त्यावर तहसीलदार नायगाव व उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी नरसी सज्जाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. याप्रकरणी विलंब न करण्याचे सुद्धा कळविले असल्याने.लवकरच सदर प्रकरणी चौकशी होऊन अहवाल प्रशासनाकडे सादर होईल व यावर पुढील काय कारवाई होईल याकडे सर्व नरसी वासीयांचे लक्ष लागले आहे.






