नांदेड : हिप्परगा थडी तालूका बिलोली येथील अल्पभूधारक शेतकरी आबन्ना शिवना आमेटवार यांची एकुलती एक
लेक कु.अनुराधा आबन्ना आमेटवार हीचे नांदेड पोलीस दलात निवड झाली आहे या मुलींनी आपल्या स्वबळावर मनाशी जिद्द बाळगून आई वडिलांसह हीप्परगा थडी गावचे नाव लौकिक केली आहे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे त्यांच्या या मेहनतीने त्यांची नांदेड जिल्हा पोलीस पदी निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण पहिली ते पाचवी हिप्परगा थडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले.सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे झाले. त्या बालपणापासूनच अतिशय जिद्दी व हुशार होते. त्यांना दहावीला ७४.६०% व बारावीला ७७.५४% मार्क घेऊन प्रथम प्राविण्यात उत्तीर्ण झाले आहेत.आणि पुढील पदवीचे शिक्षण घेण्यासाठी यशवंत महाविद्यालय नांदेड येथील कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले त्यानंतर पदवी ला देखील प्रथम प्रविण्यात ७६.०३ टक्के घेऊन उत्तीर्ण झाले. डिग्री पूर्ण झाल्यानंतर मनात एक जिद्द होती की आपण शासकीय तसेच देश सेवेसाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून आणि आपल्या मोठया भावाने पाहिलेले स्वप्न ते स्वप्नच राहिले त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या बहिणीने अहोरात्र मेहनत करून जिद्दीने,चिकाटीने व कठोर परिश्रमाने नांदेड येथेच राहून पोलीस भरतीसाठी मराठी क्लासेस संभाजी कदम सरांकडे आणि गणित विषयासाठी सचिन गोमाशे सर यांच्या कडे पूर्ण झाले.त्यानंतर २०२५ मध्ये निघालेल्या त्यांची पहिलीच भरती होती. त्याची भरती प्रक्रिया मनजे फिजिकल फेब्रुवारी २०२६ मध्ये पार पडले असून लेखी १५ मार्च २०२६ रोजी पार पडले.त्या दोन्हीत त्यांनी प्राविण्य मिळवून त्यांची नांदेड पोलीस मध्ये निवड झाली आहे.अभिमानस्पद बाब अशी आहे कि हिप्परगा थडी येथील कुंभार समाजातील आणि गावातील सरकारी नोकरी मिळवणारी ती पहिली महिला ठरल्या आहेत.हिप्परगा थडी गावातील नागरिकांनी तिच्या यशाचे कौतुक करत आहे.कारण गावातील सरकारी नौकरी साठी महिला प्रवर्गातून त्या पहिल्याच स्त्री असून त्यांची नांदेड पोलीस दलात निवड झाली आहे.तसेच त्या दैनिक अधिकारनामा बिलोली प्रतिनिधी आमेटवार राजेश यांच्या भगिनी आहेत. त्यांच्या या कठोर परिश्रमाची आणि मेहनतीने मिळवलेल्या यशाबद्दल गावातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.






