, चोरट्या पध्दतीने दिवसरात्र, 15 ते 20 हायवा च्या साह्याने एक नामवंत व्यक्ती रेती चोरुन नेणा-या रेतीमाफियांवर कारवाई
होईल का?
बिलोली ( दयानंद भद्रे)
तालुक्यातील कुडलवाडी शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे हुंनगुंदा मांजरा नदी पात्रातून शासनाचे कसल्याच प्रकारचे आदेश नसताना विना परवानगी अवैधरित्या जे.सि.बी. च्या साह्याने दिवस व रात्र रेती था उपसा केले जात आहे. यामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. सदरिल रेती माफिया हा गावातलाच एका लोकप्रतिनिधी असून याला आशीर्वाद कोणाचे? महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून रात्रंदिवस हायवाच्या साह्याने रेतीची चोरी करतो. याला हुंनगुंदा चे मंडळ अधिकारी, तलाठी यांचे आशीर्वाद आहे का? तहसील कार्यालयाने दिलेले रात्री चे भरारी पथक नाममाञ च आहे यावरून असे सिध्द होते की, कुंपणच शेत खात आहे. सध्या हुंनगुंदा व नागणी रेती माफियाची एवढी मुजोरी वाढली की, रेती माफिया कोनत्याही शासकीय अधिकाऱ्यास जुमानत नाही. ह्या रेती माफिया ची एवढी दहशत झाली की आय जी कलेक्टर एस पी कोणाला सांगायचं ते त्याला सांगा कोणीही माझं काही करू शकत नाही अशा शब्दात सांगत आहे. कारण प्रशासन दंडात्मक कार्यवाही करत नसल्यामुळे रेती माफिया दादागिमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. हुंनगुंदा परिसरात जिकडे पाहिले तिकडे रेती साठवून ठेवलेले ढिगारे दिसून येत आहेत. आणि मध्यरात्री तसेच पहाटेच्या सुमारास टिप्पर व हायवा च्या साह्याने रेती भरून कुंडलवाडी, धर्माबाद व तेलंगणा राज्यात पाठवले जाते. दैनिक भास्कर चे बिलोली तालुका प्रतिनिधी शिवराज रायलवाड व दैनिक हिंदू सम्राट चे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिरगिरे या दोन पत्रकारांनी बातमी घेण्यासाठी जायमोक्यावर गेले असता त्यांना हुंनगुंदा येथील ओम भाले व इतर रेतीमाफियावाल्यांनी या पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अश्श्लिल भाषेत शिवीगाळ केले आहे.
तरी या विरोधात तालुक्यातील जनतेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांच्या वतीने अनेक तक्रारी करुनही आपली महसूल प्रशासकीय यंत्रणा कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेवून रेती माफियांना जाणुनबुजून अभय देत असल्याचे सिध्द होते
तरी आपण या निवेदनाची दखल घेत मौजे हुंनगुंदा येथील मांजरा नदी मधील अवैधरित्या होत असलेला रेती चोरी थांबवून ती तात्काळ बंद करून रेती माफियावर तात्काळ कार्यवाही करावी, करावि अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.






