बिलोली शहरातील विजय पटणे मेमोरियल स्कूल बिलोली येथे आज दिनांक 9 मार्च 2026 रोजी शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला दिनाचे औचित्य साधून विजय पटने मेमोरियल स्कूल बिलोली येथील स्कूल चे शिक्षिका व महिला कर्मचारी या महिलांचे यथोचित सत्कार सत्कार करण्यात आले आहे. या प्रसंगी विद्यालयाच्या वतीने एक छोट्याश्या खाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले होते व शिक्षक पालक सुसंवाद सभा आयोजित करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती याच शाळेतील आंतर भारती शिक्षण संस्थेच्या सहसचिव तथा आंतर भारती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयमाला पटणे ,तसेच माता पालक सौ अनिता ज्ञानेश्वर काळे, सौ भाग्यश्री राजेश बेटेराज, तसेच पिता पालक श्री साईनाथ भैरोड, व श्री बोडके दत्तात्रय दिगंबर , हे व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची यशवतेसाठी शहरातील अनेक माता पालक उपस्थित राहून छोट्या खाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नर्सरी, एल के जी, यू के जी, वर्ग पहिला ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर प्रकारे श्री गणेशा, तमिल सॉंग, माय भवानी, तसेच अनेक गाण्यावर चिमुकल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी होते शाळेतील लहान चिमुकल्या मुलांनी व मुलींनी बहारदार संगीतमय नृत्याचा कार्यक्रम सादर सादर करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. या कार्यक्रमाला उपस्थित माता व पालकांची मोठी उपस्थिती पाहून इगळे सर व शिक्षकाने मोठे कौतुक केले पालकांची विद्यालयाच्या प्रयत्नातून होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबद्दल व बालमनावर संस्काराचे धडे रुजवता येतात आणि या कामी विद्यालयातील शिक्षक यशस्वी होत आहेत, याबद्दल समाधान व्यक्त केले.विजयपटने मेमोरीयल स्कूलचे मुख्याध्यापिका सौ . संध्या पाटील (प्री प्रायमरी मु.अ.) गंगुलवार (मुख्याध्यापक) यांनी विद्यालयाच्या प्रगतीबाबत पालकांना सविस्तर माहिती दिली. या छोट्या खाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सहसचिव तथा आंतर भारती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नंदाताई पटणे होते तर मुख्याध्यापिका सौ.सध्या पाटील मॅडम, सौ प्रणिता पाटील मॅडम अणिता कागळे मॅडम,. रूद्रायणी डोनगावकर मॅडम,.सौ
निता सब्बनवार मॅडम,.सौ
देशमुख मॅडम, सौ चव्हाण मॅडम ,सौ ठकरोड मॅडम, सौ अकुशकर मॅडम, सौ करूणा मंकावार मॅडम,
या वेळी शिक्षक इंगळे सर, एमेकर सर, गणेश मेंढेकर सर , अब्दुल सर, यळगे सर, पाटिल सर अनेक कर्मचारी सेवकानी श्रमदान दिले.





