तहसीलदार यांना राष्ट्रीय पञकार संघ भारत संघटनेच्या वतीने निवेदन
बिलोली प्रतीनीधी
बिलोली तालूक्यातील मौजे हिप्परगा थडी येथील मुरुम उत्खननाची परवानगीपेक्षा जास्त उत्खनन करणार्या गुत्तेदारवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रीय पञकार संघाच्या्वतीने तहसिलदार यांच्याकडे केली आहे.
हिप्परगा थडी येथील सयद मुनीर यांच्या गट क्रमांक 205 शेतातील मुरुम उत्खननाची नाममात्र 100ब्रास ची परवानगी काढुन परवानगीधारक शेतातुन मुरुम उत्खननान करता इतर ठीकाणी दीवस राञ उत्खनन हायवा द्वारे करण्यात येत आहे असुन यामुळे शासनाचे लाखो रुपयेचे महसुल बुडत आहे . त्यामुळे संबंधीत गुत्तेदाराची प्रशासनाने उत्खनन झालेल्या ठीकणाची ETS द्वारे मोजणी करुन जेसिबी चालकावर व हायवा चालकावर कडक कारवाई करावी.अशी मागणी तहसिलदार यांचेकडे केली आहे वेळेत चौकशी नाही केल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असे निवेदनाद्वारे तहसिलदार यांच्याकडे राष्ट्रीय पञकार संघ भारतच्यावतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.





