नांदेड वृत्तसेवा
ऊमरी तालुक्यातील रहाटी येथे लोककवी वामनदादा कर्डक लोककलावंत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३०नोव्हेबर रोजी भारतीय संविधान सन्मान परीषदेचे आयोजन करण्यात आले असुन जिल्ह्यातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र वार्ताला आयोजक मोहन लांडगे यांनी दीली आहे .या कार्यक्रमाला नांदेडचे अध्यक्ष म्हणून सूरेशदादा गायकवाड प्रमुख पाहुणे खासदार रविंद्र पाटील चव्हाण वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत दादा इंगोले राहुल लोहबंदे शिवा नरगंले वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष पंडीत ढवळे या मान्यवराची उपस्थिती लाभणार आहे संध्याकाळी सहा वाजता रविराज भद्रे बापुराव जमदाडे विकासराज गायकवाड विलास ढवळे यांचा भिम गितांचा कार्यक्रम होणार आहे तरी परिसरातील जनतेनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक मोहन दादा लांडगे यांनी केले आहे






