महाराष्ट्र वार्ता वृत्तसेवा
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही नगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांचे अर्ज आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, पक्ष निरीक्षक नागोराव पांचाळ, हिंगोली जिल्हा समन्वयक अरुंधतीताई शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साही वातावरणात दाखल करण्यात आले….
हिंगोली मधून नगराध्यक्षासाठी सारिका अभिजीत अवघड, वसमत मधून वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रभावती सिद्धार्थ खंदारे तर कळमनुरी मधून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांच्या पत्नी अपूर्वा राजू कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.






