बिलोली :-
बिलोली तालुक्यातील मौजे हुंनगुंदा नदी काठावरून सुरू असलेल्या अवैधरती उत्खनने अक्षरशः उच्छान मांडला असून हुंनगुंदा व नागणी परिसरातून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अवैधरित्या रेती वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परवाना किंवा नसताना हा व्यवसाय सुरू असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सदरील रेती माफिया हा हुंनगुंदा येथील स्थानिक चा असून हाच तो रेती माफिया मागच्या वेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे आले असते वेळेस त्यांचा ताफा अडवून त्यांना अशा प्रकारे सांगत होता की रेतीने वाहतूक करणाऱ्या हयवा मुळे सदरील हुंनगुंदा, मनुर, संगम, बामणी, हा रस्ता खराब होत आहे. असं म्हणणारा तोच रेती माफिया
TS01UA 4959
हुंनगुंदा येथील स्थानिक चा रेती माफिया दिवस रात्र चालत असलेल्या अवैध्यरित्या रेती वाहतुकीमुळे नवीन झालेला सी सी रस्त्याची विल्हेवाट होत आहे. हुंनगुंदा येथून रेती घेऊन जाणारे हायवा मनूर संगम, बामणी नायगाव मार्गे बासर येथे दररोज रात्रंदिव अवैधरित्या रेती वाहतूक होत होत आहे. स्थानिक पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या म्हणण्यानुसार दररोज हुंनगुंदा येथीन डझनबर ट्रॅक्टर व हायवा वाहनाद्वारे रेती खुलेआम ने आण होत असून संबंधित यंत्रणा बघ्याची भूमिका
घेत असल्याचा आरोप स्थानिक च्या नागरिकांनी करत आहे. कुंडलवाडी पोलीस व महसूलच्या या बोटचेपी कारभारामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत असल्याची चर्चा रंगली आहे.





