सुप्रसिद्ध भीम शाहीर साहेबराव येरेकर यांचा भीम बुद्धाच्या गीतांचा कार्यक्रम.
बिलोली /प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या निमित्ताने जिगळा क्र.2 (शंकरनगर) येथे आज भीम महोत्सवास सुरू सुरुवात होणार आहे.
दरवर्षी जिगळा येथे जयंती अतिशय जल्लोषात आणि उपक्रमशील संपन्न होत असते. जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी राहुल जिगळेकर मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रमासह प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी पहिल्यांदाच जिगळा क्रमांक 2(शंकरनगर) येथे भीम महोत्सव साजरा होणार आहे.
आज दिनांक 26 रोजी खासदार रवींद्र चव्हाण,बिलोली उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे,आमदार जितेश अंतापूरकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात होईल.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीम शाहीर साहेबराव येरेकर यांचा भीम बुद्धाच्या गीतांचा कार्यक्रम होईल.या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगाव तालुक्याचे युवा नेते भास्कर पाटील भिलवंडे, उद्घाटक म्हणून नांदेड महानगर पालिका चे गटनेते इंजिनीयर प्रशांत इंगोले,प्रमुख पाहुणे माजी सरपंच रावसाहेब पाटील येरडे, माजी सरपंच प्रताप पाटील जिगळेकर,मधुकर पाटील पिसाळे,माजी जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, माजी सभापती जि.प.संजय बेळगे माजी उपसरपंच खतगाव रवी पाटील खतगावकर, प्रा.शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, गटनेता न.प.मुखेड नागनाथ लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल शिरसे, नगरसेवक संदीप कटारे, युवा उद्योजक परमेश्वर लोहगावे, नगरसेवक विठ्ठल बेळगे, माजी उपसभापती प. स. माधव गजभारे, माजी सरपंच मुगांव विश्वंभर कांबळे, दिलीप पाटील पांढरे, पत्रकार कैलास तेलंग, पत्रकार राजेंद्र कांबळे, शंकर पाटील कानोले, आनंदा पाटील सुपारे, हणमंत पाटील कानोले,समर्थ पाटील कानोले, परबत पाटील येरडे, रावसाहेब पाटील पिसाळे आदी जन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आहवान कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राहुल जिगळेकर,आयोजक प्रशांत बनसोडे यांनी केले आहे.





