बिलोली
तालुक्यातील उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी वन विभागाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आज दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी देगलूर वनपरिक्षेत्रात कृत्रिम सिमेंट पाणवट्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्याची मोहीम राबविण्यात आली.
ही मोहीम श्रीमती मनीषा पाटील मॅडम, उपवनसंरक्षक नांदेड (IFS) व श्री भारत खेळबाडे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्पा) नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री रामराव देवकते, वनपरिक्षेत्र अधिकारी देगलूर यांच्या आदेशानुसार पार पडली.
यावेळी श्री अभय सेवलकर, वनपरिमंडळ अधिकारी देगलूर व श्री सहदेव दोसलवार, वनरक्षक केरूर यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र देगलूर अंतर्गत वनपरिमंडळ देगलूरच्या नियतक्षेत्र केरूरमधील मौजे अंजनी, मुतण्याल व केरूर परिसरातील जंगल भागात असलेल्या कृत्रिम सिमेंट पाणवट्यांमध्ये टँकरच्या सहाय्याने पाणी सोडण्यात आले.
उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोत आटण्याची शक्यता असल्यामुळे वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे व ते गावाकडे वळू नयेत यासाठी वन विभागाकडून ही उपाययोजना करण्यात येत आहे. या पाणवट्यांमुळे हरण, ससा, रानडुक्कर तसेच इतर वन्यप्राणी यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वन विभागाने उन्हाळ्याच्या काळात वन्यजीव संरक्षणासाठी अशा प्रकारच्या उपाययोजना सातत्याने राबविण्याचा निर्णय घेतला असून आवश्यकतेनुसार इतर ठिकाणीही पाणवट्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.