महाराष्ट्र वार्ता
गौतम गावंडे | बिलोली
बिलोली तालुक्यातील मौजे अंजनी येथील चि. दत्ताञ्य मारोती गंधाफुले यांची नांदेड जिल्हा पोलीस पदी निवड झाल्याबद्दल अंजनी येथील विठ्ठल मंदिर येथे गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ८:३० वाजता सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय क्षेत्रातील जेष्ठ नागरिक, तरुण मंडळी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दत्तात्रे गंधाफुले यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गणेश हांडे प्रहार, हाणमंत धुंदे, गोविंद बदे्वाड (चेअरमन प्रतिनिधी), संभाजी गंधाफुले, गोविंद गंधाफुले, वैष्णव गंधाफुले, भास्कर मुंडकर, बाबू पा. हंडे, दत्ता माधवराव हंडे, पवन गंधाफुले, शंकर महाराज, विठ्ठल पुंजरवाड,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.






