सावित्रीबाई फुले महिला एकात्म मंडळांनी औरंगाबाद येथे दिला पुरस्कार.
नायगांव/ साईनाथ कांबळे
सावित्रीबाई फुले महिला एकात्म मंडळाच्या वतीने गेल्या एक दशकापासून विविध क्षेत्रात अग्रगण्य काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.यावर्षीचा राज्यस्तरीय डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार तृतीयपंथी यांचे नांदेड जिल्ह्याचे गुरु फरीदा बकश यांना दिनांक 4 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे देण्यात आला.
फरीदा बकस हे मूळ यवतमाळ येथील असून, तृतीयपंथी साठी गेले अनेक वर्षापासून नव चेतना मिळावी यासाठी बिलोली तालुक्यातील जिगळा येथून काम करीत असतात.सामाजिक व इतर धार्मिक कामांमध्ये सुद्धा ते नेटाने समोर असतात.
मुखेड तालुक्यातील मागच्या काळात अतिवृष्टीने आलेल्या संकटात फरीदा गुरु पूरग्रस्तांसाठी केलेली मदत व जिगळा येथे माजी उपसरपंच राहुल जिगळेकर यांच्या सहकार्याने गावातील अखंड हरिनाम सप्ताह,गणेश उत्सव, भीम जयंती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती,यासह गावातील विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेऊन तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत असतात. किंबहुना तृतीयपंथी समाजातील किन्नरांना स्वावलंबी बनवण्यासाठी कमल फाउंडेशनच्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळवून दिले आहे.
याचा लेखाजोखा पाहता वरील नमूद संस्थेने फरिदा बकस यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, त्यांच्या कार्याचा थोडक्यात लेख, 35 हजार रुपये असे होते.
या पुरस्काराने जिगळा गावाचे अभिमान वाढले आहे.या अर्थाने सामाजिक कार्यकर्ते साईनाथ कांबळे यांच्या पुढाकारातून काल दिनांक 5 जानेवारी रोजी राहुल जिगळेकर मित्रमंडळाच्या वतीने फरीदा बकस यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांचा सुद्धा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राहुल जिगळेकर मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ कांबळे जिगळेकर, आनंदा पाटील कानोले, मेघाजी कांबळे ,गणेश सूर्यवंशी, विद्याधर कांबळे, कपिल गजभारे, गणेश पांचाळ, दत्ता पाटील कानोले, आकाश राक्षसमारे,राम पाटील कानोले,शिल्पा बकस,पिंकी, गोपी, इरम यासह गावातील अनेक नागरिक व तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्काराचे गावातील सरपंच प्रतिनिधी रावसाहेब पाटील येरडे, माजी सरपंच प्रताप पाटील जिगळेकर, पोलीस पाटील संजय पाटील जिगळेकर, ग्रामपंचायत सदस्य चौत्राबाई बनसोडे,रमेश कांबळे, प्रभाकर येरडे, मधुकर पाटील पिसाळे,यांनी फरिदा बकस यांचे कौतुक केले आहे.





