बिलोली
दरवर्षी प्रमाणे यंदाही सनशाईन इंटरनॅशनल स्कूल कार्ला खु. तालुका बिलोली येथे ०१ जानेवारी रोजी शाळेत आयोजित खाद्य महोत्सवाचा कार्यक्रम शेकडो सहभागी विद्यार्थ्यांनी ख-या कमाईच्या उद्देशाने विक्रीसाठी ठेवलेल्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थानी आकर्षीत ठरलेले हे महोत्सव उत्साहत संपन्न झाले
दरवर्षी प्रमाणे यंदाही आज दि. ०१ जानेवारी रोजी सनशाईन इंटरनॅशनल स्कुल येथे उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती मातेच्या पुजन करुन पुढील कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले या आयोजीत खाद्य महोत्सवात जवळपास चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते.या महोत्सवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलमार्फत विद्यार्थी व पालकांनी खाद्य पदार्थांची खरेदी करीत आनंद लुटला.विद्यार्थ्यांनी गुलाबजाम, पाणीपुरी, केक, लस्सी, भेल, लाडु,चिवडा,खिर , मिसळ,गाजर हलवा, आईस्क्रीम असे विविध खाद्यपदार्थांची विक्री केली . या वेळी पालकवर्ग, शिक्षकवृंद,विद्यार्थ्यांनी आवडी निवडीतुन खरेदी केलेल्या पदार्थाची चव घेत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यानी विक्री केलेल्या या ख-या कमाईची एकूण जमा कुंजी व शाळेच्या वतिने अनाथ आश्रमला दरवर्षी मदत केली जाते. या आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिलोली पो. ठाणे स.पो.नि. कमल शिंदे प्रमुख पाहुणे पञकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष राजु पाटील शिंपाळकर सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज ,लक्ष्मीकांत कलमुर्गे संस्थेचे चेअरमन सत्यनारायण मेरूगु प्राचार्या प्रेमा मेरगु ,स्नेहा मेरगु,अनिल तमलुरे याच्यासह शिक्षकवृद,पालक वर्ग मोठ्या संख्येनी उपस्थित होते.





