नांदेड वृत्तसेवा (दयानंद भद्रे)
मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडतीत वाडी बु गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने या गटातुन सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत त्यातच काँग्रेसचे विठ्ठल पावडे ही जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे चर्चा वाडी बु परीसरात मोठा प्रमाणात होत आहे. विठ्ठल पावडे हे वाडी बु जिल्हा परिषद गटात जिवाभावाचा माणुस म्हणून ओळखले जाते सामाजिक क्षेत्रात त्यांचे काम वाखाणण्याजोगी आहे गोरगरीब जनतेसाठी दीवसराञ मदतीसाठी धावुन जाणारा माणूस म्हणजे विठ्ठल पावडे यांचं नाव घेतले जाते त्यामुळे पक्षाने उमेदवारी दीली तर निश्चितच त्याचा विजय होईल अशी चर्चा आहे






