अटकळी प.स.गणातुन सरपंच अरुणा मारोती धर्मकरे निवडणूकण्यास इच्छुक
*नांदेड विलास शेरे
बिलोली तालुक्यातील आळंदी येथील विधमान सरपंच व भारतीय जनता पाटीचे महिला तालुका सरचिटणीस असलेल्या अरुणा मारोती धर्मकरे हे नव्याने अस्तीवात आलेल्या आटकळी गणातुन अनुसुचित जाती महिलेला राखीव असल्याने प.स निवडणुक लढविण्यास भारतीय जनता पक्षाकडुन इच्छुक असल्याचे सागितले.आटकळी गण पंचायत समिती साठी अनुसूचित जाती महिलेला राखीव सुटल्याने आटकळी गणातील जनतेतुन आळंदी येथील महिला सरपंच अरूणा मारोती धर्मकरे यांना पचांयत समितीसाठी उमेदवारी द्यावी असे मागणी जनतेतुन होत आहे. आटकळी प.स गणातुन अरूणा धर्मकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांची असल्यामुळेयेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिनिधीसी बोलताना सागितले आहे. आटकळी गण हे अनुसूचित जाती महिला प्रवर्ग आरक्षण सुटल्यामुळे परिसरातील सर्व वंचित घटकांना योग्य मळवून न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे पती मारोती धर्मकरे हे भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती तालुका उपाअध्यक्ष म्हणुन मागिल अनेक वर्षा पासुन कार्य करत पक्षाच्या सर्व कामांसाठी बुध लेवला काम करत असतात त्यामुळे आटकळी गणातुन त्यांनी निवडणुक लढवावी अशी मागणी होत आहे.भारतीय जनता पार्टी कडुन तिकिट दिल्यासचांगलाच प्रतिसाद निवडणुकीमध्ये मिळणार आहे. अरुणा मारोती धर्मकरे याना पक्षाच्या वतीने संधी दिल्यास अनुसुचित जाती महिलेला पक्षाने न्याय दिला जाईल असे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त याच्यां कडुन बोलल्या जात आहे पक्षाने संधी दिल्यास अरूणा मारोती धर्मकरे यांनी सागितले कि मोठ्या ताकतीने निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरेन असे सांगितले.




